वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील बावी येथील 24 वर्षीय तरूणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या तणावातून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. 19 जानेवारी रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाशी तालुक्यातील बावी येथील राजकुमार लहू शिंदे वय 24 वर्षे या  तरुणाने शुक्रवार  दि. 19 रोजी पहाटेच्या सुमारास मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने निराश होवून तुतीच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती येरमाळा पोलीस स्टेशनला मिळताच येरमाळा पोलीस स्टेशनचे बावी बीट अंमलदार विशाल गायकवाड व सचिन राऊत यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी तेरखेडा आरोग्य उपकेंद्रात पाठविण्यात आले. मयत राजकुमार शिंदे यांचे पश्चात आई, वडील व एक भाऊ आहे.


 
Top