धाराशिव (प्रतिनिधी)-आयोध्येतील नवनिर्मित मंदिरात दिनांक 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे. या भव्य दिव्य सोहळ्या निमित्त देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा दिवाळी सणासारखा साजरा करावा व देशातील गावागावातील शहरातील मंदिरे स्वच्छ करावे असे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने आज धाराशिव शहरातील उंबरे कोठा येथील हनुमान मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हनुमान मंदिरातील स्वच्छता करण्यात आली. 

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे भाजपा उपाध्यक्ष सुनील काकडे शहराद्यक्ष अभय इंगळे, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, दाजी आप्पा पवार, लाटे सर, नामदेव नायकल, रोहित देशमुख, अभिजीत काकडे, धनराज नवले, गणेश येडके, प्रमोद पाटील, पपीन भोसले, हिम्मत भोसले, सुनील गवळी, प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.


 
Top