धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील पोलिस मैदानावर राज्य शासनाच्या कृषी महोत्सवात शहरातील हौशी छंदी गायक कलाविष्कार अकादमी द्वारा मेलडी स्टार्स आयोजित प्रतिवर्षी प्रमाणे ' साल नया गीत पुराणे ' या अविट गीतांची मैफील संपन्न झाली. प्रथम दिपप्रज्वलन शिवसेना संपर्कप्रमुख अनील खोचरे, कृषी महोत्सव प्रमुख श्री. माने, कृषीअधिकारी आनंद समुद्रे, कलाविष्कार अकादमी अध्यक्ष युवराज नळे समन्वयक रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ, शरद वडगावकर, तौफीक शेख,  यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व मेलडी स्टार्स कलावंताचा सत्कार करण्यात आला. मेलडी स्टार्सचे प्रवर्तक युवराज नळे यांच्या प्रास्ताविका नंतर गणेशवंदन करून रवींद्र कुलकर्णी यांनी  मैफिलीस सुरुवात केली. राज्य गीत महाराष्ट्र माझा शेषनाथ वाघ , शरद वडगावकर, तौफीक शेख, यांच्या गायनासह मैफिलीत  चंद्रकांत सांगवीकर, महेश उंबर्गीकर, विस्तार अधिकारी मल्हारी माने, विधिज्ञ विधुलता धलभंजन, धनंजय कुलकर्णी,सौ. वर्षा युवराज नळे , तेरणा 94 एफ एम आर जे कु. प्रगती शेरखाने, क्षितीजा निंबाळकर, नंदिनी गाडे, श्रेया गायकवाड, मुनीर शेख, राजाभाऊ कारंडे,काझी, नितीन बनसोडे,सौ. सुनीता मानेजाधव, यांनी गायन केले. शेवटी अधिकारी सौ. कुलकर्णी कृषी अधिकारी आनंद समुद्रे यांच्या हस्ते सर्व गायकांचा प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. आई तुळजाभवानीच्या गोंधळगीतासह राष्ट्रगीतांनी मैफीली ची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन व आभार प्रभाकर चोराखळी यांनी केले.


 
Top