परंडा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद उर्दू उच्च माध्यमिक प्रशाळेतर्फे फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. आठवी ते बारावीच्या मुला मुलींनी फूड फेस्टिवल मध्ये पाणीपुरी स्टॉल, पान स्टॉल, शिरखुर्मा स्टॉल, भाजी स्टॉल, कचोरी स्टॉल, बिस्कीट स्टॉल, थंड असे वेगवेगळे 30 ते 40 लावण्यात आले होते. या स्टॉलचे उद्घाटन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जहीर चौधरी तथा अध्यक्ष वकील संघ परंडा व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण यांच्यावतीने फित कापून उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक अहेमद खतीब, जमील बांगीसर,समीना खान, मुस्तफा शेखसर, यास्मिन सय्यद, अंजली चौतमाल, गफ्फार शेख,महेंद्र शिंदे, भाऊसाहेब सूर्यवंशी, सतीश खरात, आबासाहेब, नामदेव परवाले, शिकीलकर, सुलेमान लुकडे, सादिक गणेचारी, तसेच सर्व पालक उपस्थीत होते.

 

 
Top