परंडा (प्रतिनिधी) - मुलांनी व मुलींनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी त्यांनी केलेल्या अपेक्षाचा भंग होऊ देऊ नये प्रमाणिकपणे अभ्यास करून त्यांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ जयंती सप्ताहाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. 

महाविद्यालयामध्ये दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान विविध व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.आज दुसरे पुष्प वाहताना  कविता मुसळे यांनी महिलांचे संरक्षण कायदे याविषयी आपले व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख हे उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांची उपस्थिती होती .यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी महिलांचे संरक्षण कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यासोबत चर्चा केली. महिला लैंगिक छळ  छेडछाड अन्टी रँगींग, मोबाईलवर अश्लील मॅसेजेस फसवनुक अशा विविध विषयावरती सखोल असे मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया रणजीत शिंदे या विद्यार्थिनींने केले. तर आभार ऋतूजा महाडिक या विद्यार्थिनीने मानले. शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.


 
Top