धाराशिव (प्रतिनिधी)-सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी जमीनीचे भुसंपादन थेट खरेदीने न करता कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात येत आहे. ते थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मागार्साठी जमीनीचे भुसंपादन थेट खरेदीने न करता कमी किंमतीमध्ये खरेदी करण्यात येत आहे. ते थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे असताना असे न होता रेल्वेच्या नियमानुसार त्याभागातील तीन वषार्तील सवार्धीत दराने खरेदी केलेले खरेदीखत निश्चित करणे अपेक्षीत आहे. नगररचनाकार व प्रशासन यांनी कांही जास्तीच्या किंमतीचे दस्तावेज बाजूला ठेवून भूसंपादनाचा दर निश्चित केला. त्यामुळे सांजा, उपळा या भागातील शेतकऱ्यांना एकरी 25 लक्ष तर भातंब्रा गावातील शेतकऱ्यांना 40 हजार रुपये एकर दर निश्चित केला असून, हे शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहे. तरी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन शेतकऱ्यांना भुसंपादनासाठी राज्यातील इतर ठिकाणी दिलेल्या दरानुसार जमीनीचे भुसंपादन करण्यात यावे, अन्यथा या विरोधात रेल्वे प्रशासन, महसूल प्रशासन, नगररचनाकार यांच्यासह सर्व संबंधीता विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. सर्व संबंधितांना या संदर्भात भुसंपादन दराच्या दुरुस्त्या करण्यासंदर्भात आदेशीत करावे अशी मागणीही दुधगावकर यांनी केली आहे.


 
Top