धाराशिव (प्रतिनिधी) - राजमाता जिजाऊ व माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त मराठा महिला मंचच्यावतीने 12 आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन दि.13 जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात येणाऱ्या आव्हानाला परतवून परिस्थितीवर मात करून कुटुंबाला भरभक्कम आधार देणाऱ्या व समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आदर्श माता, आदर्श उद्योजिका व आदर्श व्यवस्थापिका यांचा आयोजक मनिषा राखुंडे-पाटील यांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना शेख, मुक्ता लोखंडे यांच्या हस्ते हवालदार सरोजा शिंदे, डॉ. वृदाराणी विधाते, डॉ. अंजली बुरगुटे व सरोजा शिंदे, सुषमा दुगम, सीमा नवले, सुनिता म्हस्के, विद्या पडवळ, कविता काळे, मंदाकिनी माकोडे, वृंदाराणी विधाते, सुवर्णा काकडे, अनघा गोडगे, संगीता शेंडगे यांचा पुष्पगुच्छ व जिजाऊ सावित्री यांच्या कार्याचे पुस्तक देऊन तसेच फेटा बांधून सत्कार करण्यात आला.


 
Top