धाराशिव (प्रतिनिधी)- महर्षी अरविंद फौंडेशन आश्रम शाखा धाराशिव वडगाव( सि) येथे विश्व मानवता दिवस संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी व वडगाव (सि) माजी सरपंच सिद्धेश्वर संस्थांचे सचिव काकासाहेब म्हेत्रे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात मानवता गीत, मानवता संदेश ,मानवता संकल्प, यामधून विश्वशांतीसाठी मानवता मूल्याची जोपासना करून वृद्धिंगत करण्याचा संकल्प करण्यात आला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश कसबे यांनी केले व आभार मोहन सस्ते यांनी केले. यावेळी प्रवीण मुंडे, रोहन मुंडे, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत मुंदडा, राजीव गुरव, किशोर चाकूरकर, दीपक आंबुरे, संजय क्षीरसागर, काशिनाथ क्षीरसागर, नित्यानंद स्वामी, शर्मिला मुंडे, सविता क्षीरसागर, रेणुका अंबुरे, वैष्णवी मुंडे, वैशाली मुंडे आदी उपस्थित होते.