धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गोपाळ निंबाळकर तर व्हाईस चेअरमनपदी मारुती कस्पटे यांची सर्वानुमते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड दरवर्षी नव्याला संधी देण्याच्या उद्देशाने करण्यात आली असून प्रत्येक वर्षी नवीन संचालकाला संधी देण्यात येते.

या निवडीच्या वेळी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे, माजी सरपंच पांडुरंग कोळगे, सेवानिवृत्त अभियंता सदाशिव कोळगे, सुब्राव लोमटे, किसन मते,  माजी उपसरपंच राजाराम कोळगे, माजी सरपंच बालाजी कोळगे, किशोर कोळगे, नामदेव निंबाळकर, बालाजी गव्हाणे, विकास वडवले, अशोक गव्हाणे, शाहूराज मते, दशरथ कस्पटे, संजय भोयटे, हनुमंत लोमटे, दिलीप कोळगे, अशोक सिरसाठे, दत्ता स्वामी, ज्ञानेश्वर निंबाळकर, विठ्ठल कोळगे, अनिल भोईटे, शंकर चव्हाण, शिवाजी काकडे, अरविंद बनसोडे, गोपीनाथ कोळगे, निवृत्ती भोईटे, राजेंद्र गव्हाणे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास कोळगे सर्व संचालकासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सावतर कदम यांची उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 


 
Top