धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूर तालुका (अजित दादा गट) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष संदीप  गंगणे, युवक तालुकाध्यक्ष नितीन आबा रोचकरी,  युवक तालुका कार्याध्यक्ष समाधान ढोले, युवक शहर कार्याध्यक्ष अनमोल शिंदे, सैनिक जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,  सामाजिक न्याय विभागा जिल्हाध्यक्ष  अतुल जगताप,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, युवक उपाध्यक्ष शरद चव्हाण, अभिजीत नरवडे, माजी माजी सैनिक तालुकाध्यक्ष दत्ता  नवगिरे, ओबीसी तालुकाध्यक्ष विकी घुगे, गुड्डू माने व  तुळजापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.


 
Top