नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होतो. हा पाचवा खेटा असुन यात्रेपुर्वीचा हा खेटा असल्याने व तसेच यादिवशी भोगी असल्याने खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती.
नळदुर्ग (मैलारपुर) येथील पवित्र ठिकाणी दि.24, 25 व 26 जानेवारी 2024 रोजी श्री खंडोबा देवाची प्रचंड मोठी यात्रा भरते. यात्रेचा मुख्य दिवस 25 जानेवारी हा आहे. यादिवशी याठिकाणी किमान 5 ते 6 लाख भाविक उपस्थित असतात.सध्या याठिकाणी दर रविवारी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत.
दि.14 जानेवारी रोजी मैलारपुरात श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासुनच मोठी गर्दी केली होती. हा पाचवा खेटा असुन नळदुर्ग शहर व परीसरातील भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसुन येत होते. देवाला नैवेद्य दाखविणे, देवाला दंडवत घालणे, नवस फेडणे, मंदिरावर भंडारा–खोबरे उधळणे आदी कार्यक्रम सुरू होते. यात्रा जवळ आल्यामुळे मंदिर परीसरात मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल्स थाटली आहेत.