धाराशिव (प्रतिनिधी)-लाखो भाविकांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री  गोरोबा काकांच्या तेर नगरीत जवळपास 2500 मेंढ्या व 1 अश्वासह दाखल झालेल्या बाळुमामाच्या पालखी तळावर दर्शनासाठी 3 दिवसांपासून भाविकांची गर्दी आहे. या पालखीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर येथे दर्शन घेतले. विशेष म्हणजे पालखी तळावर सकाळी, संध्याकाळी बाळुमामाच्या आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असल्याने तेरणाकाठी भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


 
Top