धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भारतातील पहिल्या महिला शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज193 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विचार व्यक्त करताना डॉ. अजित मसलेकर सर म्हणाले की“ सावित्रीबाई यांनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या घरोघरी नेहली. महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विधवांचे होणारे केशवपण व पुण्यात न्हाव्याचा संप त्यांनी घडवून आणला. महात्मा फुले यांच्या समाजसुधारणा, चळवळीला गती देण्याचे काम त्यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा.शुभम पाटील,  गवळी मॅडम, पटेल मॅडम, बदे मॅडम, अजय शिराळ,सुरवसे शिवकुमार, सुदर्शन कुलकर्णी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंना पुष्प वाहून अभिवादन केले.


 
Top