धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार  व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे  यांच्या हस्ते नितीन बागल यांना  मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.

नितीन बागल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर च्या सिनेट सदस्य पदी दहा वर्ष उत्कृष्ट असे काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्ष व युवक जिल्हाध्यक्षपदी पदी त्यांनी या अगोदर काम पाहिले आहे. मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र धाराशिव येथे सुरू व्हावे म्हणून मा.नितीन भैया बागल यांनी 20 वर्ष संघर्ष केला असून त्याला यश आलेले दिसून येते. धाराशिव येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. धाराशिव जिल्हा त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. सामाजिक कार्यामधून धाराशिव जिल्ह्यात त्यांचा परिचय आहे. त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव पाहून राष्ट्रीय अध्यक्ष अजित  पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पदाची जबाबदारी दिली आहे.शहरी व ग्रामीण भागातील पदवीधरांचा मोठा संपर्क असून निश्चितच पदवीधर विभागाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

नितीन बागल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे व जिल्ह्यातील प्रमुख नेते यांच्या वतीने धाराशिव जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, धाराशिव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, महेश नलावडे उपस्थित होते.


 
Top