नळदुर्ग (प्रतिनिधी)- हिंदूंचे आराध्यदैवत श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दि.22 जानेवारी रोजी मोठा उत्सव साजरा करण्यात येणार असून, यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळी भव्य दीपोस्तवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमास नळदुर्ग शहर व परीसरातील हिंदु बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांनी केले आहे.

नळदुर्गचे अप्रतीम श्रीक्षेत्र रामतीर्थ हे साक्षात प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र आहे. त्यामुळे हे क्षेत्र अयोध्यापेक्षा कमी नाही. या श्रीक्षेत्र रामतीर्थला प्रभु श्रीरामचंद्र दोन वेळा येऊन गेले आहेत. त्यामुळे ही भुमी अतिशय पवित्र आहे. 

बालाघाट डोंगराच्या कुशीत असलेला हा परीसर अनेक शतकांपासुन प्रसिद्ध आहे. श्री प्रभु रामचंद्र याठिकाणी वनवासी श्रीराम व राजा श्री राम अशा दोन्ही वेळेस येऊन गेले आहेत. एकदा दक्षिणेकडे सीतेच्या शोधार्थ जात असताना आणि त्यानंतर श्री प्रभु रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभु रामचंद्रांनी ऋषींमुनींची पुजा करून त्यांचा आशिर्वाद घेतला. मात्र त्यावेळी अगस्त ऋषींनी पुजा करून घेण्यास नकार दिला. कारण रावण ब्राम्हण असल्यामुळे त्याच्या वधाने प्रभु रामचंद्रांना ब्रम्हहत्येचे पातक लागले आहे. त्यातुन मुक्त होण्यासाठी तीर्थ यात्रा केली पाहिजे असे सांगितले. त्यावेळी प्रभु रामचंद्रांनी तीर्थयात्रा सुरू केली. त्यावेळी पुन्हा श्रीप्रभु रामचंद्र नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे आले होते.

श्री प्रभु रामचंद्र नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे आल्याचा उल्लेख आनंद रामायणातील यात्राकांडात श्लोक संख्या 74 मध्ये आहे. यामध्ये केलेला उल्लेख असा आहे.

नळदुर्गम विलोक्याचानाना

पश्चय स्थुलानीही //

तुलजापुरम संस्थानलया

देवी नत्वा भचौतन // 74 //

वरील श्लोकातील उल्लेखावरून नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थचे महत्व लक्षात येईल.अशा या पवित्र व प्रभु श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दि.22 जानेवारी 2024 रोजी मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि.22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य व संपुर्ण जगाला हेवा वाटनाऱ्या मंदिरात श्री प्रभु रामचंद्रांची मुर्ती विराजमान होणार आहे. गेली 500 वर्षे हिंदु बांधव या क्षणाची वाट पाहत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे व त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लाभलेले सहकार्य यामुळे हे शक्य झाले आहे. आपला देशच नाही तर संपुर्ण जगाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ हे प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र रामतीर्थ आहे त्यामुळे नळदुर्ग शहर व परीसरातील हिंदु बांधवांसाठी श्रीक्षेत्र रामतीर्थ हे अयोध्येपेक्षा कमी नाही त्यामुळे दि.22 जानेवारी 2024 रोजी प्रत्येक रामभक्ताने याठिकाणी येऊन श्री प्रभु रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होणे गरजेचे आहे.

दि.22 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. महाअभिषेक,दुपारी महाआरती व सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी दिव्यांच्या प्रकाशात संपुर्ण मंदिर परीसर उजळुन जावावे यासाठी या दीपोत्सव कार्यक्रमात हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांनी केले आहे.


 
Top