धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यात आले. निमित्त होते बप्पांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचे. प्रथम कै. गुरुवर्य के.टी. पाटील (बप्पा) यांच्या प्रतिमेचे पूजन हभप. प्रकाश बोधले महाराज, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संचालक तथा वित्त प्रशासकीय अधिकारी संतोष कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या व्याख्यानमालेतील पहिला पुष्पामध्ये प्रशालेचे सहशिक्षक एस.सी. पाटील यांनी गुरुवर्य के. टी.पाटील यांच्या चरित्राचा आढावा घेत त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख श्रोत्यांसमोर ठेवला तर दुसऱ्या पुष्पातील व्याख्यानात सेवानिवृत्त पर्यवेक्षक बोबडे ए. एम. यांनी बप्पांच्या आठवणीसह त्यांचा विचाराचा वारसा पुढे चालवत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. शेवटच्या व्याख्यानमालेतील पुष्पात ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी या संस्थेचे वटवृक्ष गुरुवर्य कै. के.टी. पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
नंतर झालेल्या कीर्तन सेवेतून ह. भ.प. प्रकाश बोधले महाराजांनी समाजाला अध्यात्मिक गुरूची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी तुळजाभवानी बँकेचे अध्यक्ष संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी तथा संचालक आदित्य पाटील, युवानेते व उदयोजक अभिराम पाटील, प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य एस.के. घार्गे, उपमुख्याध्यापक व सर्व पर्यवेक्षक पदाधिकारी, शिक्षकशिक्षिका शिकेत्तर कर्मचारी वृंद, माजी विद्यार्थी गण सेवानिवृत्त शिक्षकवृंद,आप्तेष्ट नातेवाईक, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.