तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथे नवीन वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट संघाच्या संयोजनाने भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेचा प्रारंभ सोमवार (दि.1)जानेवारी रोजी करण्यात आला होता. तर सोमवार (दि.8) रोजी या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत विजेत्या संघांना शुक्रवार (दि.12) रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 

सध्या इंटरनेटच्या जमान्यात तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. युवकांनी क्रिकेट खेळाची आवड जोपासणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असून सावरगावात युवकांनी अतिशय चांगल्या स्पर्धा पार पाडल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यासाठी खेळाडूंना सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांनी यावेळी केले. आयोजित स्पर्धेत प्रथम विजेत्या छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट संघास भाजपा तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्याकडून 11111 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर द्वितीय विजेत्या राऊळगाव क्रिकेट संघास  भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष रोहित पाटील यांच्याकडून 7777 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर तृतीय विजेत्या संघास  5555 रुपयांचे पारितोषिक भाग्यलक्ष्मी ट्रेडिंगचे प्रमोद माने यांच्याकडून देण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक शुभम कानवले, प्रकाश कदम,आकाश पवार यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट क्लबचे काकाराज फंड, शिवशंकर गाभणे, ओम धनके, अमोल बंडगर, विशाल भडंगे, सचिन पवार, शंकर सातपुते , यांनी परिश्रम घेतले तर बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ डोलारे, ग्रामपंचायत सदस्य  परमेश्वर तानवडे, सोसायटीचे संचालक सिद्धेश्वर बंडगर, पत्रकार दादासाहेब काडगावकर ,ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील,प्रा. कानिफनाथ माळी,शाहू माळी,किरण काडगावकर, गणेश माळी,मनोज फंड, नागेश कोराळे,राहुल डोलारे, विशाल माळी, सुरज ढेकणे, संपत भक्ते, महादेव पवार, शिवाजी माळी, रंजीत साबळे यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट क्लब चे सर्व खेळाडू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ डोलारे यांनी केले.


 
Top