भूम (प्रतिनिधी)- 24 वर्षानंतर गेटटुगेदरच्या निमित्ताने एकत्र आले जिल्हा परिषद 1999 विद्यार्थी यांची बँच या निमित्ताने गेल्या 24 वर्षानंतर भेटी झाल्याने एक वेगळा आनंद मिळाल्याचे सर्वानी सांगीतले.

दि. 30 जानेवारी रोजी येथील यश मंगल कार्यालयात गेटटुगेदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शहराचे ग्रामदैवत श्री आलमप्रभू देवस्थानचे सर्व विद्यार्थी दर्शन घेवुन कार्यक्रमास सुरवात केली. यावेळी शिक्षक यांनी मार्गदर्शन केले व यानंतर विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यव्त करत जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी प्रमुख उपस्थितीत 1999 सालाचे सेवानिवृत्त शिक्षक सुकाळे, जगदाळे, सातपुते, साबळे आदी प्रमुख उपस्थितीत होते.


 
Top