तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील  आर्य चौकातील वाहतूक कोंडीत तरुण वकील सापडून त्यास वैद्यकीय उपचार उशीरा मिळाल्याने जीवा मुकावे लागल्याने सदरील ठिकाणची वाहतुक कोंडी बाबत कायम स्वरुपी उपाय योजना करावी व या वाहतुक कोंडीस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांन वर मनुष्य वधाचा गुन्हा  दाखल करण्याची  मागणी मंकावती गल्लीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटले आर्य चौक हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे  येथे शहरवासिय भाविक मोठी गर्दी असते येथे मोठ्या प्रमाणात लहान मोठे वाहाने उभी असतात तसेच अतिक्रमणे यामुळे  रोज वाहातुकीची कोंडी होत असुन, पोलिस  प्रशासनने याची  दखल घेत नाही. या वाहातुकी कोंडीमुळे नववर्षाचा प्रथम दिनी मंकावती गल्ली येथील रहीवाशी असलेले ॲड. गिरीष बाबुराव कुलकर्णी यांना दुपारच्या वेळी उपचारासाठी रिक्षामध्ये घेवुन हॉस्पीटलकडे जात असताना आर्य चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने येथे 10 मिनीटे उपचारार्थ नेण्यास घेऊन जाणारी रिक्षा यात सापडुन अडकली गेली. वेळेवर हॉस्पीटल मध्ये न पोहचल्याने ॲड. गिरीष कुलकर्णी यांचा वाटेतच मृत्यु झाला. या मृत्युस केवळ आर्य चौक येथील वाहातुक कोंडीच कारणीभुत ठरल्याने याची चौकशी होवुन सदर वाहतुक कोंडीस जबाबदार असणाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन संबंधीतावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

तसेच आर्य चौक येथे वारंवार होणारी वाहतुक कोंडी यावरती कायम स्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी निवेदनात केली असुन याची प्रत पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, मुख्याधिकारी, नगर परिषद तुळजापूर.यांना सादर केल्या आहेत. यावेर ऋषिकेश सुहास साळुंके, विनित विजयकुमार कोंडो, संजय व्यकंटशव खुरुद, विशाल विजयकुमार कोंडो सह मंकावती गल्लीतील रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top