धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या प्रथम चाचणी गळीत हंगाम पूजन समारंभ हभप. प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतरावजी नागदे हे लाभले त्याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, कारखान्याचे चेअरमन आकाश तावडे, कारखान्याचे एक्झेकेटिव्ह डायरेक्टर बिभीषण नवले, अमित तावडे, निखिल नवले, विश्वास शिंदे, व्यंकटराव गुंड, संजय पाटील दुधगावकर, भाऊसाहेब उंबरे, नादेरउल्ला हुसेनी, आनंद उंबरे, डॉ. जेवे, अशोक मगर,  मैनोदीन पठाण, बालाजी गावडे, नितीन इंगळे, गोलाबाई, राजाभाऊ सोनटक्के, बाळासाहेब कणसे, विद्याताई माने व ग्रामपंचायत सदस्य तावडे, नवले, एकंडे, गुंड ,उंबरे, तनमोर परिवारातील सदस्य हजर होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आकाश मधुकर तावडे यांनी ऊसाला प्रति टन 2800 रूपये भाव जाहीर केला.


 
Top