धाराशिव (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रशालाचे प्राचार्य पी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, माजी मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे, उप मुख्याध्यापक एन. व्ही. देटे, पर्यवेक्षक एस. पी. मुंडे, पर्यवेक्षक व्ही. के. देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भारतीय समाजव्यवस्था, लोकशाही बाबत मार्गदर्शन केले. प्रजासत्ताक दिन व झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशालेतील एनसीसी व स्काऊट विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधणारे पथसंचालन केले. हॉलीबॉल खेळाडू, अटल ट्रिकरिंग लॅब पुरस्कार विजेते शिक्षक, इयता दहावी निवड बॅच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद वीर व आण्णासाहेब कुरुलकर यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख विनय देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक  विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


 
Top