धाराशिव (प्रतिनिधी)-श्रीपतराव भोसले हायस्कूल व डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धाप्रेमी पालक संघाच्या संयुक्त विद्यामाने बाल वैज्ञानिकांसाठी तीन दिवसीय विज्ञान प्रयोग कार्यशाळेचे उद्घाटन श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य एस.के. घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

जालन्याचे प्रयोगशील विज्ञान प्रात्याक्षिक तज्ञ संजय टिकारिया व त्यांच्या टीम सदस्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत बालवैज्ञानिकांना तब्बल 200 प्रयोग स्वतः करून ज्ञान घेण्याची संधी त्या निमित्ताने धाराशिव शहरात प्रथमच उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आले.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रात्याक्षिक फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, के. वाय. गायकवाड, एस. जी. कोरडे, डी.ए. देशमुख, एन. एन गोरे, प्रा. विनोद आंबेवाडीकर आणि विज्ञान विभाग प्रमुख एस.डी. देशमुख यांचे पालक संघातील सदस्य डॉ किरण गरड, आर.बी. हुकिरे, जी. एम. बळे, सुखदेव भालेकर, अरुण कदम, सोमनाथ सांडे, भैरवनाथ भंडारकर, रामदास कदम, अमर शिराळ, अजमेरा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक महेश स्वामी यांनी केले. तर प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी कार्यशाळेसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या व शेवटी सर्वांचे आभार डॉ. किरण गरड यांनी मानले.


 
Top