धाराशिव (प्रतिनिधी)-जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्ह्यात प्रथम आले. दि.24 रोजी ज्ञानप्रबोधनी विद्यालय हराळी ता. लोहारा येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
यामध्ये जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामधून शाळा सहभागी होते. यामध्ये बावी आश्रमशाळेचा विज्ञान प्रयोगाचा विषय वाहतुक व दळणवळण मधील वळण रस्त्यावरील अपघात टाळणे (सिग्नल) होता. यामध्ये सहभागी विद्यार्थी प्रशांत अनिल पवार व पुंडलवाड राम मार्गदर्शक विज्ञान शिक्षक जाधव एन.बी., प्रा.डॉ. वडगणे संतोष, प्रा.घोडके रामचंद्र, प्रा.शेख शारेख, प्रा. भोसले देवकन्या, देशमुख अशोक यांचा संस्थेचे सचिव दयानंद मनोहर राठोड व प्रशालेचे प्राचार्य जगताप बी.यू.यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.