धाराशिव (प्रतिनिधी)- महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.
नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी संतोष भोर, महसूल तहसीलदार प्रवीण पांडे आणि उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आज नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.