धाराशिव (प्रतिनिधी)- राजे बाग येथील कपालेश्वर मंदिरामध्ये दैनंदिन पूजा करणारे व अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये, प्रसन्नता आनंद निर्माण करणारे आयोध्या येथे 22 जानेवारी, श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी महादेवाच्या या पिंडीवर राम अवतरले. या देखाव्याने पूजाविधि संपन्न झाली महादेवाच्या पिंडीला व राम यांच्या अशा आकर्षक फुलाने व पुष्पहारणे व दीप उत्सवाने अत्यंत आकर्षक देखावा करण्यात.

श्री काशिनाथ दिवटे यांचे भक्तिमय योगदान आहे. गेली अनेक वर्षापासून कपालेश्वर या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात व वर्षभर हिंदू धर्मीय सण, विविध उत्सवात त्या त्या दिवसाचे महत्त्व त्या त्या देव देवतांची प्रतिमा, महादेवाच्या पिंडीवर आपल्या चलस्वतःच्या हाताने, बोटाच्या कलेने रंग देऊन त्यादिवशी त्याचे महत्व व उत्सव काशिनाथ दिवटे यांच्या कल्पनेने साकारलेले हे चित्र असते. महाशिवरात्रीनिमित्त दिवटे यांनी कपालेश्वर या मंदिराच्या आतून बाहेरून रंगरंगोटी व आकर्षक अशी चित्रे काढून उत्सव पूर्ण व आनंदी व प्रसन्नतेचे वातावरण अनेक वर्षापासून सेवाभावी वृत्तीने, भक्तीभावाने, कसलाही मोबदला व मानधन न घेता कार्य करणारे दिवटे आहेत. हे कलाकार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लेखा विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत कामगार पुरस्कार, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू व एक बिना गुरु मागॅदशॅक मूर्तिकार व चित्रकार जन्मजात निस्वार्थी कलाकार म्हणून धाराशिवकरांना सुपरिचित आहेत. अशा या कलाकाराचे कौतुक विविध क्षेत्रातून होत आहे व या कलाकृतीसाठी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


 
Top