तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील शिवनृसिंह शिवजन्मोत्सव सोहळा समितीची शनिवारी शिवप्रेमी तरुणांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी समितीचे गठण करण्यात आले यावेळी शिवनृसिंह शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी किरण खोटे तर उपाध्यक्षपदी अनिकेत शिराळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिनांक 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तेर ता धाराशिव येथील नृसिंह वेस मधील शिवनृसिंह शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे नव्याने गठण करण्यात आले यावेळी समितीच्या अध्यक्षपदी किरण खोटे ,उपाध्यक्षपदी अनिकेत शिराळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सचिवपदी रोहित माने , मिरवणूक प्रमुखपदी तुषार बुके यांची निवड करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमासह शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी समितीचे अध्यक्ष किरण खोटे , उपाध्यक्षपदी अनिकेत शिराळ,  अमित कोळपे, माजी ग्रा प सदस्य मंगेश पांगरकर, अविनाश इंगळे, अक्षय कोळपे, तुषार बुके, कैसाल अकलकोटे, सुरज पांगरकर, सुधीर पांगरकर, सौरभ इंगळे, रोहित माने, महेश गाढवे, अनिकेत इंगळे, राहुल इंगळे, रोहन माने, हर्षद इंगळे, गजानन मांजरे, गणेश इंगळे आदिंसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी युवक उपस्थित होते.


 
Top