तेर (प्रतिनिधी) - सुनंदा अजित जगताप रा.लातूर यांना स्व.डॉ.चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

2023 पासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तेर येथील महिलेला हा पुरस्कार दिला जातो.धाराशिव तालुक्यातील तेर येथील रहिवाशी असलेल्या व सध्या लातूर येथील सिंचन विभागात उप कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या व वृक्षारोपण करून  वृक्ष जोपासणे हा छंद अनेक वर्षांपासून जोपासलेल्या व  विविध सामाजिक कार्यात सहभाग त्यांनी  घेतला असल्याने लातूर येथील सुनंदा अजित जगताप यांना 2024 चा स्व.डॉ.चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारांमध्ये स्मृती चिन्ह, मानपत्र व अकराशे रुपये देऊन विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक नरहरी बडवे यांनी जाहीर केले आहे.


 
Top