कळंब (प्रतिनिधी)-येथील आगारामध्ये महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेत वाहक चालकांचा प्रवेश करून नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

विभागीय कार्यकारिणी च्या नेतृत्वात कामगार संघटनेमध्ये इंटक संघटनेचे बळीराम कवडे, शिवाजी बांगर, नामदेव जगताप, चेतन गोसावी, सचिन गोसावी, भास्कर पिंगळे,बबन राऊत,सतीश सारूक तसेच महिला कर्मचारी सीमा भिसे ,राजकन्या गवळी कास्ट्राइब संघटनेचे जी . एम .  कांबळे, दिलीप ढगे यांनी जाहीर प्रवेश करून पावती घेतली तसेच संघटना विरहित असलेले सहकारी माऊली कासार,दत्ता शिंदे,सजन भांगे,विठ्ठल शिंदे,काका शिंदे,किरण शिंदे , हाज्जू आतार यांनी संघटना नेतृत्वावर विश्वास ठेऊन जाहीर प्रवेश घेतला . याच बैठकीत कार्य करण्याची निवड करण्यात आली. 

यात महेश थोरबोले आगार अध्यक्षपदी निवड तर  सायस खराटे यांची आगार सचिवपदी निवड करून राजाभाऊ कुंभार यांची कार्यसमिती सदस्य धाराशिव विभागीय निवड करण्यात आली. यावेळी कळंब आगारातील उमाकांत गायकवाड, गणेश काळे, ऋषी पवार, राम माळी, अनिल बांगर, बालाजी बोराडे, गणेश इंगळे, सुधाकर बांगार, गणेश गोरे, राजा राऊत, अमृत वाघमारे, रामलिंग जाधवर आदी सभासद उपस्थित होते. यावेळी संघटनेत प्रवेश घेतलेल्यांचा व कार्यकारणी निवड झालेल्या सदस्यांचा चालक वाहक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी कामगार संघटना सभासद यांनी परिश्रम घेतले.


 
Top