परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचा 30 वा  नामविस्तार दिन महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. वरिष्ठ प्राध्यापक डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने याप्रसंगी उपस्थित होते. नामविस्तार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, डॉ. अरुण खर्डे, डॉ. बी. वाय. माने, डॉ.संतोष काळे, डॉ. प्रकाश सरवदे, डॉ. गजेंद्र रंदील कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने, प्रा. अमर गोरे पाटील, प्रा. शंकर कुटे, प्रा. तानाजी फरतडे, वरिष्ठ वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षिरसागर, बबन ब्रह्मराक्षस, उत्तम माने, संतोष राऊत, श्रीमती सुनंदा, कोठुळे, जयवंत देशमुख, रामराजे जाधव, दत्ता आतकर, भागवत दडमल आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर डॉ. अरुण खर्डे यांनी आभार मानले.


 
Top