धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात (दि. 25) राहुल ज्ञानदेव हौसलमल यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबाबतचे  नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे  यांच्या हस्ते  देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

राहुल हौसलमल यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत  जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यापुढे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे,पक्ष संघटन मजबूत करणे व पक्ष वाढीसाठी जिल्ह्यामध्ये प्रयत्न करीन व दिलेल्या संधीचे सोने करीन असे त्यांनी पद नियुक्ती नंतर सांगितले. त्याचबरोबर कळंब येथील विष्णू जाधवर, इम्रान शेख, प्रतीक बनसोडे, कपिल स्वामी, अल्ताफ मिर्झा, मोहन कांबळे, आलमगीर कुरेशी, बबलू बागवान, साहिल पठाण, आयान बागवान, मोसिन बागवान, ज्ञानेश्वर खाते, नरेश अजबकर, आकाश पेठे, करण साळुंखे, आकाश बनसोडे यांचा राहुल हौसलमल यांच्या वतीने जाहीर पक्ष प्रवेश झाला.

तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल व त्यांचे सहकारी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र शिरसागर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष समीर खतीब, आंबेजवळगा जि.प गटप्रमुख सुरेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top