धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आंतर- विद्यापीठ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर येथे दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या विभागीय संघ निवड चाचणी मध्ये आपल्या दमदार खेळाच्या जोरावर धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
शिरपूर (धुळे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर विभागीय संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये 34 विविध महाविद्यालयाच्या 86 खेळाडूंनी निवड चाचणी मध्ये सहभाग नोंदविला होता. यामधून 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. यामध्ये संघाच्या उपकर्णधार पदी विश्वजीत गणेश खोचरे याची निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून विश्वजीत खोचरे याची तर गोलंदाज म्हणून संकेत खांडेकर व झिशान खान यांची निवड करण्यात आली. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. आर.एम.शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पस प्लेसमेंट, नवीन महत्वकांक्षी प्रोजेक्ट, सांस्कृतिक, सामाजिक, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात ही विद्यापीठ स्तरावर चांगली कामगिरी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आंतर- विद्यापीठ संघांमध्ये फुटबॉल साठी चार खेळाडू, क्रिकेटमध्ये तीन, अथलेटिकसाठी आठ,आर्चरी मध्ये दोन, व कुस्तीमध्ये एक अशा एकूण 18 खेळाडूंची विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली आहे. आमची महाविद्यालय निवड झालेली विद्यार्थी निश्चितच विद्यापीठाच्या संघामध्येही चांगली कामगिरी करतील असा विश्वास महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केला आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. आर.एम.शेख, सिविल विभाग प्रा.शितल पवार, प्रा.आकाश जगताप व प्रा. अबुसुफिया काझी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ संघात निवड झाल्यामुळे तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थींचे अभिनंदन केले आहे.