परंडा (प्रतिनिधी) - हिंदू मुस्लीमांचे श्रध्दास्थान असलेल्या परंडा येथील सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहिद यांच्या उरूसास दि. 20 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. उरूसानिमीत्त कव्वाली, मुशायरा, कलगीतूरा, भक्तीगीत, हिंदी, मराठी गीतांच्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.20 जानेवारी रोजी परंपरे नुसार तहसिल कार्यालयातून तहसिलदार यांच्या डोक्यावर फुलांची चादर देऊन सायंकाळी 5 वाजता संदल मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हजरत टिपू सुलतान चौक, मंडई पेठ या मार्गावरून मिरवणूक रात्री 10 वाजता दर्गाह येथे पोचून फातेहा खानी व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. प्रसाद वाटप नंतर दर्गाह मैदानावर भव्य अशी अतिषबाजी करण्यात येणार आहे.

रविवार दि .21 जानेवारी रोजी भारताचे प्रसिद्ध कव्वाल हाजी असलम साबरी यांचा दर्गाह मैदानावर रात्री 8 वाजता कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात होणार आहे. तर दि.21 जानेवारी रोजी मंडई पेठ येथे सकाळी 9 वाजल्यापासुन कलगी तूरा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सोमवार दि .22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता टिपू सुलतान चौक आठवडा बाजार येथे भारतातील प्रसिद्ध कवी, शायर यांचा मुशायऱचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि.23 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता टिपू सुलतान चौक आठवडा बाजार येथे सारेगम फेम शर्मीला शिंदे यांच्या नादवेद प्रस्तूत भक्ती गीत, हिंदी, मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम घेण्यात होणार आहे. तर बुधवार दि .24 जानेवारी रोजी रात्री आठवडा बाजार मैदानावर मौलाना मुफ्ती शमशोद्दीन कादरी, राजस्थान मकराना यांचा समाजप्रबोधन वायज बयानचा कार्यक्रम घेण्यात होणार आहे. वरिल सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी व भक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन ऊरूस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top