धाराशिव (प्रतिनिधी)- आत्महत्याग्रस्त शेतकरी सानुगृह अनुदान शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (दि.23) निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात दुधगावकर म्हणाले की, नापिकी, कोरडा दुष्काळ, शेतीमालाला भाव नसल्यामुळे कर्जाचा डोंगर जास्त झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यातच धाराशिव जिल्ह्यातील 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये 171 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 10 जानेवारी 2024 पर्यंत 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही बाब अतिशय चिंतनीय आहे. पिक विमा सानुनग्रह अनुदान योजना, चेतना योजना अशा अनेक मलमपट्ट्या लावूनही जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत 33 शेतकयांना सानुगृह अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. यामागे पोलीस रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्यामुळे सानुगृह अनुदान आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारास मिळण्यास विलंब होत आहे. या कामे तात्काळ बैठक घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अनुदान तात्काळ मिळणे बाबत कारवाई करावी, अशी मागणी दुधगावकर यांनी निवेदनात केली आहे.


 
Top