धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या अंतीम मतदार याद्या दि.23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले आहेत. दि.23 जानेवारी 2024 रोजी धाराशिव जिल्हयाची अंतिम मतदारयादी सर्व मतदान केंद्रस्तरावर, तहसिल स्तरावर व उप विभाग स्तरावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीत एकूण 13 लाख 66 हजार 722 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 7 लाख 23 हजार 825 व स्त्री मतदार 6 लाख 42 हजार 859 व इतर मतदार 38 आहेत.

01 जानेवारी 2024  या अर्हता दिनाकांवर आधारीत छायाचित्रासह मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत नव मतदार नोंदणी एकूण नमुना 6 चे एकूण 87 हजार 081 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार 43 हजार 867, पुरुष मतदार 43 हजार 201 व इतर 13 मतदार आहेत. मयत, दुवार, स्थलांतरीतचे एकूण 62 हजार 947 नमुना 7 चे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार 29 हजार 780, पुरुष मतदार 33 हजार 164 व इतर 3 मतदार आहेत. तसेच नाव व पत्ता दुरुस्तीचे नमुना 8 चे एकूण 27 हजार 104 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार 10 हजार 230, पुरुष मतदार 16 हजार 863 व इतर 11 मतदार आहेत आहेत. यानुसार छायाचित्रासह मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत एकूण 87 हजार 081 नव मतदारांचा समावेश झाला असून, 62 हजार 947 मयत, दुबार, स्थालांतरीत मयत मतदार वगळणेत आले आहेत.

दि.05 जानेवारी 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीत एकूण 13 लाख 41 हजार 395 मतदार होते. दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीत एकूण 13 लाख 66 हजार 722  आहेत. मागील अंतीम मतदार यादीमधील मतदारांपेक्षा सद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत तुलनेने 25 हजार 327 इतक्या मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. मतदारांनी आपले नाव दि.23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीत असल्याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.


 
Top