धाराशिव (प्रतिनिधी)-प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी अंतर्गत उपळा शिंगोली परिसरातील वीटभट्टया एकूण 22 असून, या भागात वीटभट्टी मजुरांची संख्या जास्त प्रमाणात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या सूचनेनुसार व वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आयुष्यमान कार्ड व आबा कार्ड मोहीम राबवत असून. या कार्डचा पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी व नागरिकांना देण्यात येत आहे.
या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या साह्याने एकूण 1209 उपचार व शस्त्रक्रियांवर रुग्णास मोफत सेवा देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कॅन्सल हृदयरोग शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मेंदू शस्त्रक्रिया मूत्रविकार व त्यावरील शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा यात समावेश आहे करण्यात आलेला आहे. तरी जास्ती जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सहाय्यक पांडुरंग पांचाळ, सुरेश गंगावणे, एल. एच. व्ही. पद्मिनी पाटील यांनी केले आहे.