भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे हाडोंग्री  येथील जिल्हा परिषद शाळा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी काशीनाथ जावळे तर उपाध्यक्षपदी नागेश साखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड प्रक्रिया माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताप्पा तळेकर सरपंच उल्का मगर यांच्या उपस्थितीत पार पडली

यावेळी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमीला अभिवादन करुनप्रतिमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष काशिनाथ जावळे व उपाध्यक्ष नागेश साखरे यांच्या हस्ते करुन पुढील समिती यामध्ये मु.अ.सचिव सचिन गोवर्धन,सदस्य म्हणुन सरपंच उल्का मगर प्रशांत कदम गीता चव्हाण ज्ञानेश्वर शिरसागर अन्नपूर्णा तळेकर रणजीत घोंगडे संध्या कदम अतुल वाघमारे विक्रम जावळे सोमेश्वर टेकाळे आदीची निवड करण्यात आली.

याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताप्पा तळेकर सरपंच उल्का मगर माजी शालेय समितीचे अध्यक्ष रविंद लोमटे संदीप मगर आबासाहेब साखरे समाधान तळेकर दादा लांडगे बाळासाहेब पाटील विशाल कदम सुरेश अंधारे योगेश वीर अमोल कागदे संदीप टेकाळे अमोल तळेकर ऋषिकेश तळेकर आत्मलिंग भरनाळे गणेश शिरसागर सुधीर शिरसागर यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top