कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या धावपळीच्या युगात बस चालकाने बस मध्ये आपला परिवार आहे असे समजून नशा पाणी न करता वाहन व्यवस्थित चालवावे व शिस्तीचे पालन करावे असे मत राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाचे यंत्र अभिंयता डी. डी. जाधव यांनी कळंब येथे कार्यक्रमात बोलताना मत व्यक्त केले. येथील बस आगारात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे दि. 11 ते 25 जानेवारी  या पंधरवाड्याच्या कालावधीत राज्यभर आयोजन केले जात आहे.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन बु गुरुवार दि ,11 जानेवारी  रोजी दुपारी 11 वाजता कळंब आगारात धाराशिव विभागाचे यंत्र अभियंता डी . डी . जाधव यांच्या हस्ते  फीत कापून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळबं आगाराचे आगार प्रमुख एम. डी. राठोड  हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव विभागाचे यंत्र अभियंता डी. डी. जाधव, विस्तार अधिकारी सुधाकर चौरे, प्रा. मोहन जाधव, कळंब  तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक हे होते.

यावेळी कार्यक्रमासाठी कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, प्रभाकर झांबरे, वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप, ननवरे ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे, विलास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सडक सुरक्षा जीवन सुरक्षा सुरक्षितता मोहीम याविषयी मान्यवरांनी वाहक-चालक व प्रवाशांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले. तर आभार प्रभाकर झांबरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top