धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील अग्रनामांकित चिंतामणी को- ऑप क्रेडीट सोसायटीच्या नववर्ष 2024 दिनदर्शिकेचे जिल्हा सहकार अधिकारी तथा सहकार प्रशिक्षण अधिकारी मधुकर जाधव व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आल़े

धाराशिव   येथे सोसायटीच्या कार्यालयात शनिवारी (द़ि30) हा कार्यक्रम घेण्यात आल़ा यावेळी चिंतामणी सोसायटीचे चेअरमन विनोद निंबाळकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित, सचिव रविशंकर पिसे, संचालक सुहास तेरकर, अमोल नाईकनवरे, किशोर पवार, गोपीनाथ पवार, विजय मुगळे, संदीप इंगळे, जमशेद पठाण, अनुज कुदळे, रमजान तांबोळी, पाशा शेख, अमीर तांबोळी, वैभव गव्हाणे आदी उपस्थित होत़े


 
Top