धाराशिव (प्रतिनिधी)-दिलेला शब्द पाळत आपल्या महायुती सरकारने मराठा बांधवांना आरक्षण दिले यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे जल्लोष साजरा करुन मराठा बांधवाना मिठाई वाटुन शुभेच्छा देण्यात आल्या.
मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी आपले सरकार कायम सकारात्मक व आग्रहीच होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा बांधवांना दिलेला शब्द पुर्ण करुन दाखवला त्याबदल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकाचे आभार मानले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष सुनील काकडे, विनोद गपाट, प्रविण पाठक, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, संदीप इंगळे, रोहित देशमुख, ओम नाईकवाडी, धनराज नवले, मेसा जानराव, विनायक कुलकर्णी अभिजीत काकडे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.