धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणानुसार आणि आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी असणाऱ्या कंपनी आमंत्रित करत आहे. त्याच माध्यमातून एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी ही एक अग्रगण्य ऑटो कंपोनेंट उत्पादक कंपनीचे कॅम्पस ड्राईव्हसाठी आयोजन केले होते.  भारतातील सर्वात मोठी ॲल्युमिनियम डाय-कास्टिंग कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी 2 आणि 3 व्हीलर ऑटो कंपोनंट उत्पादक करणारी ही कंपनी आहे.   एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज ही कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील ॲल्युमिनियम कास्टिंग, सस्पेंशन, ट्रान्समिशन आणि ब्रेकिंग आदी विविध उत्पादनांची निर्मिती करते.दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन कॅम्पस ड्राईव्ह घेतला. कंपनीचे हेड विनायक मुले यांनी मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या असून त्या मधून 20 विद्यार्थीची इंटर्न्स बेस निवड केली. 

या विद्यार्थ्यांना कंपनी मार्फत पहिले 6 महिने स्टायपेंड सहित प्रशिक्षण देणार असून त्यांना इंडस्ट्री नॉर्मच्या योग्यतेनुसार बनवणार असून विद्यार्थी हे रेडी इंजिनिअर होण्यासाठी मदत होणार आहे. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने  म्हणाले कि इंटर्न्स बेस निवडीमुळे मुलांना खूप फायदा होतो. शिकण्यास भरपूर मिळते व विद्यार्थ्यांना चांगला स्टायपेंड ही मिळतो आणि स्टुडंट्स इंडस्ट्री प्रमाणानुसार तयार होतात. महाविद्यालय नेहमीच इंटर्न्स बेस निवडीला प्राध्यान्य देते. यामुळे  विद्यार्थ्यांची उच्च दर्जाच्या कंपनीमध्ये प्लेसमेंट संख्येमध्ये व पॅकेज मध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील आणि महाविद्यालयाचे समन्व्यक प्रा. गणेश भातलवंडे व सर्व कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदरील कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन टीपीओ प्रा. अशोक जगताप, प्रा. रणजित दंडनाईक, रामेश्वर मुंढे यांनी केले होते.


 
Top