कळंब (प्रतिनिधी)- धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोपा या ट्रेडचे निदेशक सागर नवनाथ पालके यांची नेट विषयात 

"Computer Science And Applications" या विषयातून उत्तीर्ण झाल्याबद्दल सांस्कृतिक सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे, प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे, निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक विनोद जाधव, निदेशिका कोमल मगर, विनोद कसबे, सूरज काटे यांची उपस्थिती होती.

 

 
Top