धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात आत्महत्याचे सत्र सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील हळदगाव येथील 22 वर्षीय प्रतिक रंजित सावंत या तरूणाने आत्महत्या केली आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या या तरूणाने चिठ्ठी लिहीत शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मी प्रतिक सावंत आत्महत्या करीत आहे. मराठा आरक्षण मिळलेच पाहिजे, मी माझे आयुष्य त्यासाठी संपवीत आहे. तरी सरकारने दखल घ्यावी, एक मराठा लाख मराठा अशी चिठ्ठी लिहली आहे.


 
Top