कळंब.(प्रतिनिधी)-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ही थीम घेऊन सात दिवशीय शिबिर संपन्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयाच्या वतीने मौजे डिकसळ येथे सकाळी 11 वाजता जनजागृती रॅलीचे आयोजित करण्यात आले होते. 

सदर रॅलीमध्ये मुलगी शिकवा देश वाचवा ,पाणी आडवा पाणी जिरवा,झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा अशा सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या उपदेश पर घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. या रॅलीला प्राचार्य. डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य. प्रो.हेमंत भगवान, उपप्राचार्य,प्रो. सतीश लोमटे,लेफ्टनंट. डॉ.हरी पावडे, प्रा. अर्चना मुखेडकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मीनाक्षी जाधव, डॉ. संदीप महाजन, डॉ. नामानंद साठे,व हनुमंत जाधव अधीक्षक तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष डीकसळ ,अरविंद शिंदे, अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर, व रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top