धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, भारतीय राष्ट्रवादी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीने अनेक भारतीयावर कायमची छाप सोडली गेली आहे. ते आझाद हिंद फौज या संघटनेची स्थापना करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वात प्रसिद्ध मुक्ती सेनानी, सुभाषचंद्र बोस यांच्याकडे अपवादात्मक नेतृत्वगुण होते. आणि ते एक करिष्माई वक्ते होते . त्यांच्या घोषणांमध्ये 'दिल्ली चलो' , 'तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा 'यांचा समावेश आहे.त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन केले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठे योगदान दिले. ते त्यांच्या समाजवादी धोरणांसाठी तसेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वापरलेल्या सशक्त रणनीतींसाठी प्रसिद्ध आहेत. अशा महान देशभक्ताची जयंती आपण महाविद्यालयात साजरी करत आहोत. या जयंतीच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top