धाराशिव (प्रतिनिधी)-22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून, नळदुर्ग शहरातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या “रामतीर्थ देवस्थान“ येथे मंदिर स्वच्छता उपक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सहभागी होवून स्वच्छता केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 14 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान विविध मंदिरांमध्ये श्रमदान करण्यात येत आहे. या प्रसंगी श्री रामतीर्थ देवस्थान येथे अनेक वर्षांपासून मंदिर स्वच्छ ठेवण्यासाठी परिश्रम घेणारे बाबुराव राठोड यांचा सत्कार व त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
स्वच्छता आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे अभूतपूर्व कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून घडत आहे. तसेच यावेळी अनुलोम संस्थेचे वस्तिमित्र व स्थानमित्र यांना प्रभु श्रीरामाची मूर्ती व संदेश प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अनुलोम संस्थेच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मंदिराचे विश्वस्त बलभीमराव मुळे, मंदिराचे पुजारी शुक्ला महाराज, अनुलोम संस्थेचे धाराशिव उपविभाग जनसेवक गणेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.