कळंब (प्रतिनिधी)-येथील बस आगारा मध्ये दि. 24 जानेवारी रोजी चालक दिन साजरा करण्यात आला.
या वेळी आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक म्हणून बालाजी भारती, सहाय्यक वाहतूक अधीक्षक बालाजी मुळे, अभिजीत धाकतोडे तसेच आगारातील इतर चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी चालकांना चालक दिनानिमित्त जास्त भारमान आणणारे चालकांचा सत्कार करून चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप सर्व चालक वाहकांना अल्प उपहाराचे वाटप करून करण्यात आला. याप्रसंगी आगारातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.