धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि.27) राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजय निंबाळकर यांच्या हस्ते कोहिनूर हॉटेल येथील पहिला मजला येथे करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर हे होते. याप्रसंगी संजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे काम धडाडीने चालू असल्याचे सांगून येणाऱ्या काळात सातत्याने हे काम पुढे चालू ठेवू असे मत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शरद पवार, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी सामान्य माणसाबरोबर त्यांच्या न्याय मागण्यासाठी खंबीरपणे उभारणार व लढणार असे सांगितले. प्रारंभी संजय निंबाळकर यांचे राष्ट्रवादीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष आयाज शेख, जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे, अमोल पाटील, प्रदीप डोके, शेखर घोडके, तुषार वाघमारे, रंजीत वरपे, आदित्य पाटील, रोहित बागल, रणवीर इंगळे, रमेश देशमुख, शिवाजी सावंत, अमर गुंड, सुरेखाताई जाधव, माळाले ताई, अनिल जाधव, इक्बाल पटेल, बालाजी डोंगरे, नामदेव चव्हाण, शामराव पाटील, राहुल धाबेकर, नाना कसबे, नारायण तुरूप, सुरज वडवले, वाहेद शेख, चंद्रकांत डावरे, चेतन वाघमारे, समाधान वाघमारे, सरफराज कुरेशी, राजकुमार बोबडे, अमीर पठाण, इब्राहिम इनामदार, किसन पंडागळे, सतीश गायकवाड, हेमंत भोरे, कुणाल कर्णवर, अनंत कुलकर्णी, संजीव पाटील, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.