धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आळणी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रथम सकाळी ढोल, ताशा, हलगी च्या गजरात लेझीम पथका सह गावातून प्रभातफेरी काढण्यात अली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देशभक्ता च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी प्रस्ताविका मद्ये शाळेचा लेखाजोखा प्रमुख पाहुणे व गावाकऱ्यासमोर मांडला. जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आळणी येथे, ए. टी. इस., एन. एस एस सि.,.,जुनियर आय.ए.इस., मंथन, सातारा सैनिक स्कूल, स्कॉरशिप, नवोदय,संजीवनी सीबीएससी स्कूल लोणावळा इत्यादी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून अद्यापन सदर शाळेत केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते त वाढ झाल्याचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनि प्रस्ताविकामध्ये सांगितले. तसेच जिजाऊ जयंती निमित्त शिवनेरी मित्रा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध व काव्यवचन स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा स्तरावर घेतलेल्या विविध स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाण पत्राचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनि कवायत व साहित्य कवतीचे विविध प्रकार सादर केले. लेझीम पाथकाने सर्वाना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कृष्णा गाडे, संतोष चौगुले,हरिदास मेहेत्रे, पोलीस पाटील प्रमोद माळी, तंटा मुक्ती अध्यक्ष, शाम लावंड, प्रसाद वीर, ग्रामपंचायत सदस्यां संजीवनी पौळ, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम हे होते.
तसेच गावातील प्रतिष्ठित संदीप पाटील, माजी सैनिक गाडे, संदीपान मालकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लहू तोडकर, जीवन तांबे, माऊली कुदळे, ग्रामसेवक काकासाहेब माळी, शिवनेरी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, मधुकर कोरे, अमोल कोरे, बाळासाहेब माळी, दादासाहेब गायकवाड ,नितीन तांबे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती वर्षा डोंगरे, सुनीता कराड, राधाबाई वीर, क्रांती मते, सुलक्षणा ढगे,मंजुषा नरवटे, उत्तम काळे, दिनेश पेठे अश्विनी भांगे यांनी परिश्रम घेतले.