धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालक  प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तंबाखू मुक्ती शपथ घेण्यात आली. नाट्य शास्त्र व लोककला विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. गणेश शिंदे यांनी सर्वांना शपथ दिली. यावेळी विद्यापीठ उपपरिसरातील सर्व  विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top