धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र सुरु केले आहे.आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक - 2024 करिता हे संपर्क केंद्र सुरु ठेवण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे.त्यानुषंगाने मतदारासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय,धाराशिव येथे जिल्हा संपर्क केंद्र कार्यान्वीत केले आहे.जिल्हा संपर्क केंद्राचा टोल फी क्रमांक 1950  हा आहे.

जिल्हयातील मतदारांनी <https://electoralsearch.eci.gov.in/>या वेबसाईटवर जावून आपले नाव मतदार यादी असल्याची खात्री करावी.तसेच काही अडचणी असल्यास जिल्हा संपर्क केंद्र टोल फी क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.  


 
Top